The Dham River, located in Arvi Taluka, Maharashtra, serves as a crucial water resource for the residents of Wardha districts. It supports both drinking water needs and agricultural activities in the region. The river is also home to the Dham Dam, situated near Arvi in the Wardha district.
View DetailsRiver Length: 86 Km
Origin Location: Gundmund, TalAaravi
Confluence Location: Saungi Berada, TalSamudrapur
District: Wardha, Nagpur Division
Name and Contact of The Coordinator:
Murlidhar Belkhode- 9822523895
Madhav Kotasthane- 9422142781
Sunil Rahane- 9423119430
Bharat Mahoday- 9850307960
धाम नदी ही वणा नदीची उपनदी आहे.
धाम नदीचा धामकुंड तालुका कारंजा जिल्हा वर्धा येथे होतो.
Latitude 78°22'05" Longitude -21°04'25'
धाम नदीची लांबी 86 किमी आहे.
महाराष्टात धाम नदीचे खोरे वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), आर्वी, सेलू, वर्धा, समुद्रपूर या पाच तालुक्यात आहे.
वरील पाच तालुक्यातील 184 गांवे धाम नदीखोऱ्यात आहेत.
धाम नदीचे खोऱे हे WRW BD-1, WRW BD-3. WRW BD- 4, BRW BD- 7 या पानलोटक्षेत्रात आहे.
लेंडी नाला, मोती नाला, वाघाडी नाला, पंचधारा नदी, बोर नदी, हे धाम नदीची प्रमुख उप नदी आहे.
धाम नदीचा संगम हा सुजातपुर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे वणा नदीशी होतो.
Lattitude- 20°40'43"N Longitude- 78°52'41"E
नदीपात्र लगतची गावे:-
अनुक्रमांक
गावाचे नाव
तालुका
1
धामकुंड
कारंजा
2
हिवरा तांडा
आर्वी
3
वाढोणा
आर्वी
4
पिंपळखुटा
आर्वी
5
दानापूर
कारंजा
6
महादापूर
कारंजा
7
खैरवाडा
कारंजा
8
काचनूर
आर्वी
9
नानही
आर्वी
10
खरांगणा
आर्वी
11
मोरांगना
आर्वी
12
मजरा
आर्वी
13
कासारखेडा
आर्वी
14
सावद
आर्वी
15
खैरी
आर्वी
16
चेंडकापूर
आर्वी
17
सेवा
आर्वी
18
धुलवा
आर्वी
19
सुकळीबाई
आर्वी
20
खेर्डा
आर्वी
22
आंजी
सेलू
21
येळीकेळी
सेलू
22
वानोडा
वर्धा
23
इटकी
वर्धा
24
करताडा
वर्धा
25
महाकाळ
वर्धा
26
नागटेकडी
वर्धा
27
पवनार
वर्धा
28
वाघापूर
वर्धा
29
केसलापूर
वर्धा
30
कुटकी
वर्धा
31
तळोदी
वर्धा
32
खरांगणा(गोडे)
वर्धा
33
तुळजापूर
वर्धा
34
वघाळा
वर्धा
35
टाकळी (किटे)
सेलू
36
दिंदोडा
सेलू
37
मदनी
सेलू
38
मुधापुर
सेलू
39
साखरा
सेलू
40
हिवरा
सेलू
41
बावापुर
समुद्रपूर
42
साकुर्ली
समुद्रपूर
43
सावंगी( देरडा)
समुद्रपूर
45
सुजातपुर
समुद्रपूर
वर्धा जिल्हा नकाशा.
धाम नदी वरील ओलिताचे क्षेत्र दर्शवणारा नकाशा
पाणलोट क्षेत्र नकाशा
नदीचे टोपोशीट
अ) तलाव, तलाव, विहिरी, ओढ्यांवरील चेक बंधारे, नदीवरील केटी व्हायर्स त्यांचे जीपीएस वाचन आणि साठवण तपशील
नदीपात्रातील पुर्वीचे डोह/आताची स्थिती
धाम नदीकाठावरील गावाचे पात्रात २५-३० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक डोह निर्माण झाले होते. अर्जुन, बेहडा, चिंच, आमराया वनस्पतींनी नदीची दोन्ही तटं मोठ्या प्रमाणात समृद्ध होती. वनांमध्ये गवतांची कुरणं व गावात गायरान जमिनी, झुडपे, इत्यादी वृक्षवल्ली असल्याने नदी तटं स्थिर राहून जमिनीची धूप होत नव्हती. कालांतराने हे सर्व नष्ट झाल्याने व नदी तटावरील नाल्यांवर व नद्यांवर अतिक्रमण झाल्याने बहुतांश डोहही गिटाड, खडसंगा, वाळू, माती व नदीत टाकलेल्या कचऱ्याने बुजलेले आहे. ही सर्व डोहं उपसून नदी पात्र मोकळे केल्यास भूजलात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सुचवलेली आणि प्रस्तावित कामे
धाम खोऱ्यामधील धाम नदी व तिचे उपनदी, नाले, ओहोळ यावर शासनाद्वारे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी जलसाठे व धरणं तयार केलेली आहेत. तथापि धाम प्रकल्प जलाशय व इतर जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात गिटाड, खडसंगा, वाळू, माती, कचरा इत्यादीने बुजलेली आहेत. ते जलसाठे पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे. तसेच नदी नाला पात्रात बांधण्यात आलेली कोल्हापूर पद्धतीचे/ वसंत/साठवण/शिवकालीन/ सिमेंट बंधारे यामध्ये पाणीसाठा करण्यात आलेला नसल्याचे अभ्यासात आढळले त्यामुळे धाम नदीच्या वरील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून गवळी समाजाचे नागरिक पाणी टंचाईच्या कालावधीत जानेवारी ते जून पर्यंत स्थलांतरण करीत आहेत तर काही कायम स्वरूपी विस्थापित होत आहेत.
धाम नदी काठावरील गावांना जल जीवन मिशन अंतर्गत नदी काठावर विहिरी खोदून त्याद्वारे पिण्याचे पाणी पुरविल्या जात आहे तथापि नदीतील पाणी, सांडपाणी, जडधातू, रेसिड्युअल पेस्टीसाईड्स याने प्रदूषित असल्याने नदी काठावरील गावे व वर्धा शहरातील नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळले आहे.
याकरीता जागोजागी जैविक बायो रेमेडीयल वेटलँड करण्यात येऊन तसेच नदी नाल्यांच्या काठावर सांडपाण्यातील विष शोषून घेणाऱ्या वृक्षांची लागवड करून रायपेरीअन झोन करणे आवश्यक ठरते.
नदी खोऱ्यातील गावातील पाणी टंचाई पिण्यासाठी व जनावरांसाठी
धाम नदी खोऱ्यातील कारंजा व आर्वी तालुक्यातील गावात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष अभ्यासात जाणवले. धाम कुंड ते खरांगना मोरांगणा गावापर्यंत गवळालू पाळीव जनावरांची मोठी संख्या असून चाऱ्यासाठी कुरणांची कमतरता, जंगलातील चरायला प्रतिबंध, जनावरांना पिण्यासाठी व वापरासाठी पाणी नसणे यामुळे या दहा गावातील गवळी समाज विशेषतः पुरुष वर्ग दरवर्षी जनावरांसह वऱ्हाडात स्थलांतर करतो व ह्यामुळे दूध व दुग्धजन्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन प्रति कुटुंब उत्पन्न कमी झालेले आहे.
याकरिता पठारावर पडणाऱ्या सर्व पावसाचे ओढा, नाल्यांवर छोटे छोटे अमृत सरोवर तयार केल्यास मोठ्या प्रमाणात भूजल पुनर्भरण होईल व विहिरी व नाले भरपूर पाण्याने समृद्ध होतील व धाम नदी खोऱ्यातील पिण्याचे पाणी टंचाई व भूपृष्ठ जलात वाढ होईल.
a) राखाडी आणि काळे घरगुती सांडपाणी
(b) औद्योगिक सांडपाणी
धामकुंड ह्या गावाचे उगमापासून ते सुजातपूर येथील वणा नदी सोबत संगमा पर्यंत एकूण ८६ कि. मी. च्या लांबीमध्ये नदीकाठावरील ४५ गावांचा अभ्यास करण्यात आला. बहुतांश गावातील करडे आणि काळे सांडपाणी स्वच्छ भारत मिशनने बांधलेल्या शोष खड्ड्यात न मुरता थेट नदीत येत असल्याचे आढळले, त्यामुळे नदीतील पाणी काळ्या रंगाचे व अशुद्ध असल्याचे आढळते. आधीच्या नळ योजनांच्या व जल जीवन मिशन अंतर्गत नव्याने होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या जलस्रोत विहिरी ह्या बहुतांश नदीच्या ब्लू लाईनच्या प्रतिबंधक क्षेत्रामध्ये तर काही नदी काठावर असल्याने सांडपाण्यात आढळणारे जड धातू, रेसिड्युअल पेस्टीसाइड्स व बॅक्टरीया इत्यादी अपायकारक घटक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याद्वारे जात असावेत. नदीच्या पाण्यातील जड धातू व विषारी रसायन ह्यांची NEERI सारख्या गणमान्य संस्थे द्वारे तपासणी होणे गरजेचे आहे.
प्रदूषणाचे आरोग्यावर परिणाम
धामनदीच्या पाण्यामध्ये नदीकाठावरील मोठ्या प्रमाणात गावातील व वर्धा शहरातील सांडपाणी मदनी येथे धाम नदीस येत असल्याने गावातील अभ्यासांमध्ये प्रामुख्याने बी.पी. व शुगरच्या रुग्णांमध्ये जास्ती वाढ तसेच किडनीचे, कॅन्सरचे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे अभ्यासात आढळले तसेच नदी काठावरील गावांचे व वर्धा शहराचे स्रोत हे धाम नदीच्या काठावर असल्याने पावसाळ्यात व इतर ऋतूंमध्ये देखील जलजन्य आजार जसे कोलायटिस, अमिबियासिस, डायरिया तत्सम आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असलेले अभ्यासात आले.
गावांतील अस्तित्वातील उपलब्ध घनकचरा व्यवस्थापन व प्रत्यक्षात निरीक्षण..
धाम नदी काठावरील संवाद व अभ्यास यात्रेत प्रत्येक गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नॅडेप खताचे हौद बांधल्याचे व कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला डस्ट बिन व वाहतुकीसाठी तीनचाकी गाड्या पुरविण्यात आल्याचे आढळले तथापी बहुतांश गावांमध्ये नॅडेप खताच्या हौदात शेण संकलन न करता जागोजागी शेणाचे व कचऱ्याचे उकिरडे पडलेले आढळले. काही ठिकाणी हे नॅडेप हौद विना वापर तुटलेले आढळले तर गांडूळ खत/ vermi compost प्रक्रिया केंद्रे ३-४ वर्षांपासून विनावापर आढळले.
गावांतील अस्तित्वातील सांडपाणी व्यवस्थापन व प्रत्यक्षात निरीक्षण
स्वछ भारत मिशन द्वारे सर्वच गावात छोटे मोठे शोषखड्डे, उघडी गटारे व भूमिगत गटारे बांधकामे केल्याचे आढळले तथापी शोषखड्ड्यातील सांडपाणी प्रक्रिया न होता मोठ्या प्रमाणात नदीत जाऊन नदीतील पाणी प्रदूषित करत असल्याचे आढळले. बऱ्याच ठिकाणी मोठ्या शोषखड्ड्याची बांधकामे निकृष्ट दर्जाची व खचलेली आढळली.
नदीपात्रातील विहिरी आणि इतर अतिक्रमणे
कुटकी-तळोदी येथील नदीकाठावरील जमीनींवर अतीक्रमण करून वृक्ष-तोड केल्याने ठिसुळ/कमजोर झालेले नदीकाठ त्यामुळे नदीपात्रात पुराचे वेळी नदीत वाहुन आलेले वृक्ष, झुडपे व नदीत टाकलेला शेतीतील कचरा, प्लँस्टीक पिशव्या त्यावर खरडुन आलेली सुपीक माती, गाळ/रेती ह्यामुळे जागोजागी बेट तयार होऊन त्यावर झुडपे व विषपर्णी वनस्पती उगवलेली आहेत. येणा-या पावसाळ्यात पाण्याचे प्रवाहाला नदीपात्रात पुरेशी खोली व रूंदी न मिळाल्याने नदीचे पाणी गावठाणातील घरांमध्ये व शेतशिवारात घुसुन प्रचंड नुकसान करीत आहे व ही परिस्थिती नदीकाठावरील सर्वच गावात आहे .
ओढा/ नाला व नदीकाठावरील सर्व गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतने त्वरीत ठराव घेऊन मा. जिल्हाधिकारी, वर्धा कार्यालयास प्रत देऊन एक प्रत मा. उप-जिल्हाधिकारी (रोहयो), वर्धा कार्यालयास तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांवरील तरतूद करून प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन निर्णय घेऊ शकेल.
धाम नदीच्या काठावरील गावठाणात व बहुतांश शेतजमिनीवर पूर गेल्याने सन २०२२ च्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खरिफ पिकांचे नुकसान झाले असून शेकडो हेक्टर सुपीक शेतीच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत व त्याकरिता शासनाला मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देखील द्यावी लागली आहे तर काही ठिकाणी ओढा, नाले व नदीला पूर आल्याने बैलगाडी वाहून जीवितहानी घडण्याचे देखील घटना घडलेल्या आहेत.
एकीकडे ओला दुष्काळ व पूरस्थिती ह्याकरिता ओढा, नाले व नदीच्या पुराच्या वेळी अतिक्रमणामुळे नदी बुजून पुराच्या पाण्याला पुरेसे क्षेत्र न मिळणे हे देखील एक महत्वाचे कारण आहे.
त्याकरिता ओढा, नाले, नदी यांचे पुरेसे खोलीकरण व रुंदीकरण करून नदीतील राडा रोडा व खडांगा याद्वारे पांदण रस्त्याचे मजबुतीकरण, पूर प्रवण शेतजमिनीचे व गावठाणाचे मातीच्या भरावाद्वारे पूर संरक्षण भिंत तयार केल्यास दुहेरी काम होऊन दुष्काळ व पूरस्थिती यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल.
वर्धा जिल्ह्यातील एकुण वन जमीन 1075.22 चौ.की.मी.
एकुण क्षेत्रफळाशी वन जमीनीची टक्केवारी 17.04 %
सेंद्रिय, नैसर्गिक शेती व्यवसायी, प्रगत शेतकरी यांची यादी आणि त्यांची खासियत धामनदीच्या खोऱ्यामध्ये पंचधारा, वाघाडी, मोतीनाला व बोर इत्यादी उपनद्या असून या क्षेत्रामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, चना, गहू व धामनदीच्या काठावर काही प्रमाणात ऊस पिकाचे क्षेत्र प्रामुख्याने आढळते. काही गावांमध्ये संत्रा , सीताफळ , लिंबू, केळी, आवळा ही फळपिके प्रामुख्याने आढळलीत.
धाम नदी खोऱ्यामध्ये प्रामुख्याने उस, कांदा, आद्रक, मक्का, जवर, गहू, कापूस, मोसंबी, संत्री, बाजरी, बार्ली, हरभरा, सोयाबीन तसेच तेलवर्गीय पिके, डाळवर्गीय पिके, भाजीपाला, चारा पिके आशा स्वरूपाची खरीप रब्बी आणी उन्हाळी आशे तीनही हंगाम व काही बारमाही हगमची व बहुवार्षिक पिके घेतली जातात.
अ) मासे (प्रजाती), पक्षी, झाडे, औषधी वनस्पती इ.
धाम नदीच्या खोऱ्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग येत असून उर्वरित राखीव व संरक्षित वनांचे मोठे प्रमाणात क्षेत्र आहे. वन्य प्राण्यांमध्ये पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, कोल्हे, रोही, हरणं, चितळ, रानससे, सरपटणाऱ्या वन्यचरांमध्ये घोरपड, मुंगूस, नाग, साप, सरडे तसेच मोर, घुबड, तितर, बटेर, घार इत्यादी वनपक्षी आढळतात. जलचरांमध्ये तिलापिया, तंबू, रोहू, कतला, मृगल, वाव, कासव इत्यादी प्रजाती आढळतात.
०१
सौ. साधनाबाई चौधरी
8888772118
०१
श्री. सतीशराव चवरे
9665152743
०२
श्री. किशोरराव शेकापुरे
8605377107
०२
कु. दुर्गाताई चरडे
9767752631
०३
श्री. सतीशराव चौधरी
9075302668
०३
श्री. अरविंदराव एडाखे
9637105979
०४
श्री. श्रीधरराव कालोकार
9022505743
०४
श्री. मुकेशराव कराळे
9049673206
०५
.श्री. चेतनराव चौधरी
8605377107
०५
श्री. जयंतराव नेपटे
8308722256
०६
श्री. ज्ञानेश्वरराव बावणे
9921665549
०६
श्री. शंकरलाल राठी
9423421424
०७
श्री. सीध्दार्थराव चौधरी
9552169089
०७
.श्री. दिपकराव दाभणे
9561429381
०८
श्री. वसंतराव नितवणे
9011288515
०८
श्री. राजाभाऊ एकापुरे
9689252613
०९
श्री. प्रल्हादराव मसराम
-
०९
श्री. भानुदासजी काळपांडे
9657397981
१०
श्री. विनोदराव कुसराम
8308221720
१०
श्री. नरेशराव मसराम
7498785221
११.
श्री. राजेश्वरराव देवगडे
91725273880
15 Jan 2025
15 Jan 2025
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
Our team is here to provide the guidance and resources you need. Together, we can achieve meaningful results.
Contact UsPune
The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.
pune
The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.
Nashik
The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.