In Sangali & Satra District
River Length: 125 Km
Origin Location: Yerla River originates from Solknath Hill in the north of Khatav Taluka of Satara District.
Confluence Location: Bramhanal, Sangli, Maharashtra
Name and Contact of The Coordinator:
Sundargiri Maharaj 9421179399
Prakash Jadhav 9145707134
Sampatrao Pawar 9657737537
Dr. Jay Kulkarni 9552589751
येरळा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
येरळा नदीची लांबी 125 किमी आहे.
महाराष्टात येरळा नदीचे खोरे सातारा आणी सांगली जिल्ह्यात आहे.
येरळा नदीचे खोऱे हे के.आर– 9, के.आर– 10, के.आर– 11, के.आर– 23, के.आर– 24, के.आर– 25, या पानलोटक्षेत्रात आहेत.
नांदणी नदी, कर्पुर नदी, चॉन्द नदी, या तीनही येरळा नदीची प्रमुख उप नदी आहेत.
येरळा नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ३०४१ चौ .कि.मी. आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव व कराड तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव या तालुक्यामध्ये नदीचे खोरे पसरलेले आहे.
येरळा नदीचा संगम कृष्णा नदीस सांगली जिल्ह्यातील ब्रम्हणाळ येथे होतो.
या नदीवर वडूज, मायणी व भाकूची वाडी येथे जलसिंचन प्रकल्प आहेत.
येरळा नदीचा इतिहास:-
येरळा ही नदी प्रचीन काळी वेदावती या नावाने ओळखली जाई. या नदीच्या तीरावर बसीन ऋषि वेद पठण करीत. या नदीवर नेर आणि येरळवडी ही दोन लहान ब्रिटिशकालीन धरणे आहेत. येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुके खटाव, खानापूर, तासगाव तालुक्यांतील लोकांची जीवनदायिनी आहे. येरळा नदी ही सहामाही वाहिनी असून इतर सहा महिने नदीचे पात्र कोरडे असते. इ.स. १९८० सालापासून या खोऱ्यातील अत्यल्प पावसामुळे या नदीच्या खोऱ्यातील लोक भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. येरळा नदीचे खोरे आणि माण नदीचे खोरे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाडा समजले जाते. माण आणि येरळा या नद्यास नदी जोड प्रकल्प अतिआवश्यक आहेत. या नदीला जर पुनरुज्जीवित करायचे असेल आणि बारा महिने वाहती ठेवायचे असेल तर नदी जोड प्रकल्पाची, तसेच नदीच्या पात्रातील वाळू उपसा थांबवण्याची गरज आहे.
येरळा नदीच्या किनारी खटाव तालुक्यात नागनाथवाडी येथे पुरातन शिवमंदिर आहे. याच येरळा नदीच्या किनारी पुसेगावचे श्री सेवागिरी महाराज यांचे मंदिर आहे. खटाव येथील प्रसिद्ध हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर व पांडवकालीन मंदिर ही येरळा नदी काठी आहेत.
पाणलोट क्षेत्र नकाशे
येरळा नदी खोरे नकाशा
Elevation Map Yerla Basin
Groundwater Potential Map of Yerla Basin, Dist - Satara
LAND USE / LAND COVER MAP of YERLA BASIN
Map Showing Prioritization for Artificial Recharge
VILLAGE MAP of YERLA BASIN, Dist- SATARA.
सातारा जिल्हा टोपोशीट
येरळा नीदी टोपोशीट जिल्हा सातारा